कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख प्रात्यक्षिके व अभ्यास सहलीद्वारे व्यावसायिक व्हावे - नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील


लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील उपस्थित होत्या.
                     सिमॅप व जनसेवा फौंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांनी चार दिवसीय अभ्यास दौऱ्यादम्यान महाविद्यालयाच्या चार भिंतीतील विचार सोडून व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा भेटी दरम्यान केले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या अंतर्गत सिमॅप ही एक संशोधन प्रयोगशाळा असून सन १९५९ पासून ती औषधी व सुगंधी वनस्पतीपासून संशोधनातून समाज उपयोगी उत्पादने निर्माण करून त्याचे औद्योगिकीकरण करून मोठया प्रमाणावर उत्पादन घेत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी ३३ विद्यार्थी व ७ शिक्षक रवाना झाले असून १५ जुने ते १८ जून दरम्यान सिमॅप मधील शास्रज्ञांद्वारे निर्मित तंत्रज्ञान ओळख व संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याच्या नियोजनासाठी सौ. रुपाली लोंढे व डॉ. विशाल केदारी यांनी विशेष कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस