योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली - भाग्येश जावळे


लोणी(प्रतिनिधी):लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या "माजी विद्यार्थी संवाद" या कार्यक्रमाअंतर्गत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २००८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले की आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि  त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताना आयुष्यातील आनंदही अनुभवा, आपले मित्र,नातवाईक, छंद ही जोपासावे.
          कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहनही भाग्येश जावळे यांनी विद्यार्थ्यांना केले.                          भाग्येश जावळे हे सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी  म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे यांनी केले तर सुत्रसंचालन सौरभ केदार यांनी केले तसेच महाविदयालयाच्या माजी विदयार्थी समन्वयक प्रा. सारिका पुलाटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस