शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा - सौ.सुजाता थेटे


प्रवरेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
लोणी (प्रतिनिधी): आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लांबी, रुंदी आणि खोली अशी त्रिसूत्री पूर्ण असावी  लागते तसेच आपल्या जीवनातही त्रिमिती पूर्ण केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, या निमित्त लांबी म्हणजे दीर्घायुषाची,
रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्तीची व खोली म्हणजे परोपकार.  प्राप्त ज्ञानाचा व अर्थार्जनाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी वापरला, तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन सौ. सुजाता थेटे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी केले.
                या वेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता थेटे उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके प्रा. सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नी नलगे, प्रा. महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा. स्वरांजली गाढे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.
                     या वेळी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वत:चे वलय निर्माण करावे. केवळ नशीबावर अवलंबून न राहता प्रामाणिकपणा व अपार कष्ट घेऊन नियोजित ध्येय प्राप्त करावे.अंतिम वार्षितील विद्यार्थी सोनाली बनकर,विद्या वर्धीनी,आभा मुसळे, अश्विनी सोळुंके,सौरभ फुलपगार,अतुल जांभुळकर, सौरभ भालके,चेतन मोरे इ. विद्यार्थ्यांना  मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले व हे महाविद्यालय म्हणजे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून येथे आम्ही घडलो याचा आनंद होत असून, मित्रांची भेट होणार नसल्याची खंत व्यक्त केली.
                    प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील गावडे व प्रेषिता यंदे यांनी केले व शेवटी आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विशेष कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस