अवगत असलेले ज्ञान सादरीकरणासाठी सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण महत्वाचे - डॉ. मधुकर खेतमाळीस


प्रवरानगर दि. १४ सप्टेंबर, २०१९ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
                       एपीजी, लर्निंग पुणे यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या सहा दिवसीय प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी एप्टीट्यूड, रिझनिंग, पर्सनीलिटी डेव्हलपमेंट व सॉफ्ट स्किल सारखे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार येत असल्याची माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली.
                        आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोटात असलेले ज्ञान ओठात आणण्याची कला आशा प्रशिक्षणातून आत्मसात झाल्यामुळे आम्ही आता शहरी भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच टक्कर देऊ असा विश्वास प्रशिक्षनार्थी सौरभ केदार याने व्यक्त केला.
                        सहा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, प्रा. मनीषा खर्डे व खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण देणारे विद्यार्थिप्रिय  एपीजी लर्निंग चे श्री. अमित मांजरे, सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षक श्री. विनायक घावले व एप्टीट्यूडचे प्रशिक्षक श्री. भालचंद्र देशपांडे यांनी विशेष कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस