आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित


प्रतिनिधी (लोणी): "कृषी, पर्यावरणीय आणि उपयोजित मधील अलीकडील प्रगती वैश्विक विकासासाठी विज्ञान या विषयावर डॉ. यशवंतसिंग परमार बागकाम आणि वनीकरण विद्यापीठ, नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश,  वनस्पती रोगशास्त्र रिसर्चच्या सहकार्याने पर्यावरण विकास संस्था (एईडीएस) संस्था, कृषी संशोधन केंद्र, कैरो युनिव्हर्सिटी गिझा, इजिप्त आणि त्रिभुवन विद्यापीठ, वानिकी संस्था, पोखरा कॅम्पस, नेपाळ याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षांचा विद्यार्थी सौरभ सुभाष केदार सहभागी झाला होता.
                    परिषदेच्या उदघाटन प्रसंगी हिमाचल प्रदेश राज्यपाल श्री. बंडारू दत्तरेय यांनी येणाऱ्या तीस वर्षाची पर्यावरण आणि पाण्याची परिस्थितीची काळजी व्यक्त करत संशोधकांना यावर संशोधनाचे आवाहन केले आणि परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. यशवंत परमार  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. परविंदर कौशल ह्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची सादरीकरणे पाहिली.
                   या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतासह दहा देशातील आठशे पेक्षा जास्त संशोधकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये महाविद्यालयातील सौरभ केदार याने "महत्त्वपूर्ण ट्रायकोडर्मा स्पेसिज ची सद्य स्थिती आणि वनस्पती रोगांच्या जैव नियंत्रणामध्ये वापर” या विषयावर लोणीच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या प्रा. प्रेरणा अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली भित्तीपत्रकाचे सादरीकरण केले. त्यावर परीक्षक समितीमधील कुलगुरूंनी त्याचे, महाविद्यालयाचे  आणि मार्गदर्शकांचे पदवीच्या विद्यार्थ्यांना देत असलेल्या संधीचे विशेष कौतुक केले तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला भेट देण्यासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली. संशोधनासाठी पुढील लागणारी मदत कायम करत राहील असे आश्वासन दिले.
                    सौरभ केदार याने भित्तीपत्रक स्पर्धेत  दुसरे स्थान पटकावले, त्याचा सन्मान सोलाण जिल्हाधिकारी आणि संयोजक छत्रपाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आला, तर त्याच्या कृषी क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल *आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी* या पुरस्काराने त्रिभुवन वाणीक संस्था, पोखरा नेपाळ यांनी सन्मानित केले. सौरभच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस, अतांत्रिक विभागाचे संचालक प्रा. दिगंबर खर्डे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी व प्रभारी प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे आदींनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस