सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर


लोणी (प्रतिनिधी): युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात होणार आहे. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार यांचा देखील समावेश आहे. ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या, कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना 'गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' देऊन गौरवण्यात येते.
              माजी कृषी अधीक्षक अधिकारी श्री. प्रकाश सांगळे, ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय न्याहारकर, द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले या कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीने पुरस्कार्थी विद्यार्थ्यांची निवड केली. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) या चारही कृषी विद्यापीठांशी संलग्न कृषी व संबंधित विद्याशाखेच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
              सौरभच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष व नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.  शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस