कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

प्रवरानगर दि १९ डिसेंबर २०१९ : आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या "कमवा आणि शिका' योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती "कमवा आणि शिका " योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली. उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये " कमवा आणि शिका "ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या...