प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा


प्रवरेच्या विद्यार्थ्यांचा बंगलोर येथे तीन दिवसीय अभ्यास दौरा संपन्न

लोणी | प्रतिनिधी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा बँगलोर, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
            तीन दिवसीय अशा या अभ्यास दौर्यामध्ये कृषी विद्यापीठ, बँगलोर या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी वनस्पती शरीरविज्ञान व वनस्पती जैवतंत्रज्ञान या विभागांतील विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान व शेतीसाठी त्याचा होणार उपयोग या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या संकल्पनेतून टाटा रॕलीस् संलग्नित 'मेटाहेलिक्स' या जगप्रसिद्ध बीज उत्पादन कंपनीस ही विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील सर्व प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक क्षेत्र यांची माहिती घेतली. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध विभागात काम करणाऱ्या तज्ञ मान्यवरांचे व शास्त्रज्ञांचे चर्चासत्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
            या अभ्यासदौ-याअंती विद्यार्थ्यांनी मदर बायोटेक या साग ऊती संवर्धन निर्मिती कंपनीस भेट देऊन तेथील प्रत्येक विभागाची व प्रक्रियांची तपशीलवार माहिती घेतली. विश्वेश्वरैया औद्योगिक व प्रौद्योगिक संग्रहालय या ठिकाणीही भेट देऊन तेथील विशेषत्वाने प्रदर्शित केलेल्या दैनंदिन जीवनातील संसाधनाची प्रत्यक्ष कार्यप्रणाली व उपयोग याचा अभ्यास केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी लालबाग वनस्पती उद्यान या ठिकाणीही भेट देवून वेगवेगळ्या नामशेष होणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला. एकूणच या तीन दिवसीय बँगलोर येथे आयोजित केलेल्या अभ्यासदौ-यात विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचे ज्ञान अवगत झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला व विद्यार्थ्यांनी अशा अविस्मरणीय क्षणांबद्दल संस्थेच्या व महाविद्यालय संचालक मंडळाचे आभार मानले. जैवतंत्रज्ञानातील वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे व विद्यार्थ्यांचा पुस्तका बाहेरील दृष्टीकोन वाढावा हा मुख्य हेतू साध्य झाल्याबाबत कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी समाधान व्यक्त केले.  या अभ्यासदौ-याच्या यशस्वीतेसाठी डॉ. विशाल केदारी, डॉ. अभिजीत दसपुते, प्रा. श्रद्धा रणपीसे व कु. मनिषा वराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस