कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड


प्रवरानगर(प्रतिनिधी):
              लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. राणी माने हिने गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली. 
              या युवा महोत्सवात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाला वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक मिरवणूक, पटनाट्य असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.
            तिला या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चव्हाण व महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिनल शेळके आदींचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थीनीच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, महासंचालकांच्या कार्यकारी सहायक सुश्मिता माने,
सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस