कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न


सादतपूर मध्ये रा.सो.यो.मार्फत पी.एम किसान योजना शिबिर

लोणी(प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळसाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  मौजे सादतपूर ता-संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कृषी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक मा.डॉ.एम बी खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार संपन्न झाल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी केली...
सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयोचे कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण,सादतपुर येथील सरपंच सौ.अंजनीताई कडलग, श्री.बबनराव काळे,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे तसेच स्वयंसेवकांनी कॉलेज -नॉलेज -व्हिलेज या प्रक्रियेतून ग्रामविकासात आपले ज्ञान राबविले पाहिजे आणि शिबिरामुळे विद्यार्थी खेड्यांशी जोडला जातो असे प्रतिपादन केले.
                  या सात दिवसाच्या शिबिरात विविध प्रकल्प सादतपूर या गावत राबवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण आणि नैसर्गिक संवर्धन, सर्वांगीन ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, बेटी बचाव, हागणदारी मुक्त अभियान, वृक्ष लागवड इ.उपक्रम राबविले आहे. गावात जवळपास १४० झाडांची लागवड करून लोकसहभागातून सदर झाडांना सरंक्षण जाळी बसविल्या आणि ग्रामस्थांना झाडांचे संगोपन करण्यसाठी प्रोत्साहित केले.  तसेच गावात पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले. संत गाडगेबाबा एक मुक्त सिंचन, कृषी क्षेत्रातील भविष्यातील शक्यता, आरोग्यदायी योग, व्यक्तिमत्त्व विकास, ग्रामीण विकासात युवकांचा वाटा, महात्मा गांधींचे ग्रामीण स्वराज्य या विषयांवर व्याख्याने आयोजित केले.
शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा प्रचार आणि प्रसार करून सदर योजनेसाठी नावनोंदणी आणि ज्यांची नावनोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे अद्ययावत करणे यासाठीचे  विशेष शिबीर आयोजित केले.प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना आरोग्यविषयी मूलभूत सवयी सांगितल्या. सदर शिबिराच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या प्रसंगी
चेअरमन वि.का.सह.सोसायटी सदातपुर,मा.श्री.सतीश बाबासाहेब तांबे व्हा चेअरमन वि.का.सह.सोसायटी सदातपुर,मा.श्री.रामनाथ नाथा काळे चेअरमन, मा.श्री.बबन बाबा शिरसाठ ग्रामविकास अधिकारी,मा.श्री.प्रकाश मॅचिंद्र गोरे उप सरपंच,मा.श्री.जयराम बापूसाहेब गुंजाळ संचालक प्रवरा सहकारी बँक लि. मा.श्री.हेमंत वाघमारे मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा,मा.श्री.सुनिल अप्पासाहेब मगर कामगार पोलीस पाटील सादतपुर,श्री. विजय मगर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, श्री.संदीप कडलग,प्रा.अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम पार पाडण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर प्रा.अमोल सावंत, प्रा.महेश चेंद्रे, प्रा.विशाल केदारी, प्रा.स्वप्नील नलगे आणि तृतीय वर्षातील स्वयंसेवक विक्रम पासले, आदित्य जोंधळे, सोन्याबापू केदार, धनश्री टेके, भावना शिंदे, प्रिया गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास