अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रवरेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय ठरले उपविजेते पदाचे मानकरी


मुंबई विद्यापीठात आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संशोधक प्रकल्पाची निवड

प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी निवडुंगा पासून बनवला बायोगॅस

राहुरी (प्रतिनिधी): शेतीची दिवसेंदिवस होणारी बिकट परिस्थिती व जमिनीतील पाण्याची घटणारी पातळी यावर उपाय म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  'निवडुंगा पासून बायोमिथेन तयार करणे' अशी भन्नाट कल्पना शोधली आहे. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
         याच अनुषंगाने दि.०३ व ०४ जानेवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आंतरमहाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, सायली ढेरंगे, ओमप्रकाश शेटे व सचिन वाघ यांच्या संघाने ' फोर जी बायोमिथेन प्रोडक्शन फ्राॕम कॕक्टस' या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा विभागांमध्ये ११९ संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन या विभागात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.
          मुंबई विद्यापीठ येथे दि. २७ ते ३१ जानेवारी, २०२० रोजी होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी विक्रमसिंह पासले कृषी व पशुसंवर्धन या विभागात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. अभिजीत दसपुते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल म. फु. कृ. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, डॉ. वाय. जी. फुलपगारे व डॉ. आर. एम. नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
              या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, कार्यकारी सहायक सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस