वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास यश निश्चित - सुभाष टिळेकर


वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास यश निश्चित - सुभाष टिळेकर


लोणी(राहता): वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास  यश निश्चित प्राप्त होते असे मत नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त राज्य जी. एस. टी. सुभाष टिळेकर यांनी व्यक्त केले. कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय लोणी यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी 'राज्यसेवा व बँकिग' या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी टिळेकर बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,वाचन संस्कृती टिकणे फार महत्त्वाचे आहे व याच वाचनामुळे आपणास सभोवतालचे चौफेर ज्ञान प्राप्त होते.
                यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस त्याचबरोबर कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषीकेश औताडे व तिन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. मधुकर खेतमाळस यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
               कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रश्नांचे निरसन टिळेकर यांच्याकडून करून घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रमसिंह पासले याने केले तर आभार ऋषीकेश औताडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस