प्रवरेच्या विद्यार्थ्यांची आदर्श गावांना अभ्यास सहल




जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचीही घेतली भेट

परिवर्तन घडवायचे असेल तर शब्दाला कृतीची जोड द्या - अण्णा हजारे

प्रतिनिधी (लोणी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची आदर्श गावांना दोन दिवासीय अभ्यास सहल आयोजित केली होती.या सहलीमध्ये स्वयंसेवकांनी आदर्शग्राम राळेगणसिद्धी व हिवरेबाजार या प्रमुख गावांना भेटी देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली.या अभ्यास सहली दरम्यान स्वयंसेवकांनी निघोज येथील मळगंगा देवी व भौगोलिक रांजणखळगे तसेच वडगाव दर्या येथील दर्याबाई-वेल्हाबाई देवस्थान भौगोलिक लवणस्तंभ यांची निर्मिती व नैसर्गिक रचना याचाही अभ्यास केला.
              या अभ्यास सहलीमध्ये स्वयंसेवकांनी निघोज व वडगाव दर्या येथे पर्यटकांमुळे निर्माण झालेला अस्वच्छ परिसर ही साफसफाई करून स्वच्छ केला.राळेगणसिद्धी व हिवरेबाजारच्या विकासाचे प्रारूप पाहून विद्यार्थी भारावून गेले.यावेळी स्वयंसेवकांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली.स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने यावेळी अण्णांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण बदलाची प्रक्रिया जाणून घेतली.यावेळी अण्णांनीही विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला.यावेळी बोलताना अण्णा म्हणाले की,आपल्या शब्दाला वजन प्राप्त करायचे असेल तर आपले जीवन चारित्र्यसंपन्न हवे तसेच परिवर्तन घडवायचे असेल तर शब्दाला कृतीची जोड द्या व आयुष्यात काही गोष्टींचा त्याग केला तरच तुम्ही मोठ्या उंचीवर पोहचाल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.हिवरेबाजार येथेही स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन तेथील लोकांकडून गावच्या विकासाची व पोपटराव पवांरासारख्या नेतृत्वाची कहाणी जाणून घेतली.
               या संपूर्ण अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अनेक अंशी भर पडली.या सहली दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्शग्राम राळेगणसिद्धी यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.या सहलीसाठी रा.से.यो चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत व रा.से.यो चे स्वयंसेवक उपस्थित होते.या अभ्यास सहलीसाठी स्वयंसेवकांना कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळीस व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे व सर्व शिक्षकवृंदांनी प्रोत्साहित केले.अशा आदर्श ठिकाणांच्या व व्यक्तीमत्वाच्या भेटी घडवून आदर्श विद्यार्थी व समाज घडवणे हा महाविद्यालयाचा यामागचा प्रमुख हेतू आहे.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस