परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही महत्त्वाची - डॉ.आनंद चवई



कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

लोणी(प्रतिनिधी) : परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे व गाडगेबाबांनी याच मार्गाचा अवलंब करत दिवसभर परिसर स्वच्छता व संध्याकाळी किर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करण्याचे काम केले असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद चवई यांनी केले.
                  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात करण्यात आले या प्रसंगी डॉ.चवई बोलत होते.संत गाडगेबाबांनी सर्वस्वाचा त्याग करून समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच अनेक रुढी,परंपरा व अंधश्रद्धा याचे निर्मूलनही केले असेही डॉ.चवई पुढे बोलताना म्हणाले.यावेळी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने आपल्या प्रास्ताविकातून संत गाडगेबाबांच्या कार्याचा आलेख थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.
             या कार्यक्रमासाठी कृषी व संल्ग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळीस ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे,रा.से.यो चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.भाऊसाहेब घोरपडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता,प्रामाणिकपणा व भूतदया यावर संत गाडगेबाबांचा विशेष भर होता.या गोष्टी विद्यार्थ्यांनीही अंगीकारणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस