क्रीडा स्पर्धेमध्ये लोणी येथील कृषी संलग्नित महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

प्रवरानगर दि २३ जानेवारी, २०१९(प्रतिनिधी):लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेमध्ये लोणी येथील कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये नेत्रदीपक यश संपादन केले असल्याची माहिती कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस यांनी दिली.
           या स्पर्धेमध्ये लोणी येथील कृषी संलग्नित महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नेतृत्व केले होते. त्यामध्ये कृषी महाविद्यालयातील कु. प्राजक्ता गवळी या खेळाडूने टेबल टेनिस मध्ये कांस्यपदक मिळविले तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ज्ञानेश्वर काळे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळविला तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु. सृष्टी थोरवे या विद्यार्थीनीने हॉलीबॉल संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली. क्रीडा संचालक प्रा. सिताराम वरखड यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
        प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषिभूषण बन्सी पाटील तांबे,दत्ता पाटील शिरसाठ, सचिव भारत घोगरे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविदयालयचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, कृषी जैवतंतत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस