प्रवरेत वादविवाद स्पर्धा संपन्न


कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा संघ ठरला प्रथम

प्रवरानगर (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कृषी व संलग्नित महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
           'ईव्हीएम मशीन की बॕलेट पेपर' असा विषय असलेल्या वादविवाद स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.प्रविण गायकर यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व व मतदान काळाची गरज का आहे या अनुषंगाने प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्रा.सत्यन खर्डे,प्रा.राहुल विखे,प्रा.क्षिरसागर,प्रा.प्रेरणा अभंग,प्रा.अश्विनी घाडगे,प्रा.भाग्यश्री सोमवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
              या वेळी दोन्ही संघानी ईव्हीएम मशीन व बॕलेट पेपर या विषयांवर आपले मत मांडताना एकमेकांच्या मताचे खंडन-मंडन केले.या मधून सुसंगत अशी चर्चा घडून अनेक नवीन पैलू या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना ज्ञात झाले.या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी पवार याला उत्कृष्ट वादविवाद स्पर्धक म्हणून गौरवण्यात आले.या वादविवाद स्पर्धेसाठी प्रा.महेश चंद्रे व प्रा.संतोष वर्पे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
            मतदान हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे व तो प्रत्येकाने बजावला पाहिजे यासाठी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने उपस्थितांना मतदान आधिग्रहणाची शपथ दिली.या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास