प्रवरेच्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांची औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड


लोणी (राहाता) : शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील २८ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती शैक्षणिक समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी दिली.
           यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,मांजरी (पुणे) या ठिकाणी सौरभ फुलपगार,प्रविण नरसाळे,निलेश गोडे,प्रियाल गागरे,शिवदास माळी,प्रतीक कुटे,मयूर गोडे,अमोल बोरुडे त्याचबरोबर यश बायोटेक, नाशिक या ठिकाणी महेश सूळ, कमलेश शिंदे,गौरव कदम,हनुमान माळगे,अक्षय मेमाने त्याचबरोबर नॅशनल ग्रेप्स रिसर्च सेंटर,मांजरी(पुणे) या ठिकाणी  शुभम हांडे,प्रतीक चौधरी,पूजा टोनगे,अक्षरा कवडे,सृष्टी थोरवे,सोनाली बनकर ,अमृता अढाव,ऋतुजा बहिरट याच बरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या ठिकाणी तेजस्वीनी हिंगे,मयुरी घोडके,आभा मुसळे आदी विद्यार्थ्यांची निवड झाली असून मीटकॉन रिसर्च इन्स्टिट्युट,पुणे या ठिकाणी प्रेरणा साठे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी संभाजी नेहे तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट,लोणी या ठिकाणी रोहित घुगे,मनोज लवांडे इत्यादी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
        हे सर्व विद्यार्थी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समितीस मांडणार आहेत.या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान घेऊन शिकता येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात या गोष्टी उपयोगी पडणार आहेत.
        या यशस्वी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व विश्वस्थ श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, तांत्रिक संचालक डॉ. के. व्ही. टी. रेड्डी, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. धनंजय आहेर व प्राचार्य ऋषिकेश औताडे व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस