शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम - डॉ.मधुकर खेतमाळस


कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी

लोणी (प्रतिनिधी):- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ऋषीकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,डॉ.विशाल केदारी, प्रा.अमोल सावंत,श्री.सुनिल कानडे,श्री.दत्तात्रय कांबळे,सौ.निर्मळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                            या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर खेतमाळस यांनी बोलताना शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम आहे, शिक्षण व कठोर परिश्रम घेतले तरच विद्यार्थी आपल्या जीवनात प्रगती करू शकतात. त्यामुळे कितीही संकटे आली तरी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवावे व खूप शिकावे असे आवाहन केले तसेच महात्मा फुले यांचे विचार अंगिकारणे आजही महत्वाचे आहे हे पटवून दिले. रासयो ची स्वयंसेवक कु.राणी माने हिने महात्मा फुले यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
                           हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रासयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसेवक विक्रमसिंह पासले यांनी केले तर शेवटी आभार तुषार खर्डे यांनी मांडले.शुभम खर्डे, अमोल तरकसे, अजिंक्य पाटील, विजय घोगरे,श्रीकांत डांगे, संकेत चोपडे,प्रतीक्षा अभंग प्रेषिता यंडे,मयुरी हिंगे,मोनिका आंधळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस