कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉक कार्यक्रमात स्टुडन्ट पार्टनर द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन




 शिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम
प्रवरानगर दि. २२ जुलै, २०१९ :
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी "इंटर्नशीप टॉक" द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना  इंटर्नशालाची  इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.
           लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये  विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून  महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय आहेर याने केले
                  इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर विक्रमसिंह पासले,कु. ऋतुजा भालेराव, कु.मेघना गुरव व प्रशांत बटुळे यांनी अतिशय सुलभपणे समजावून सांगितले.या विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती.त्याचाच एक भाग म्हणून या इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते.आदित्य जोंधळे याने आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस