सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

लोणी (प्रतिनिधी): युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात होणार आहे. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार यांचा देखील समावेश आहे. ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या, कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना 'गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' देऊन गौरवण्यात येते. माजी कृषी अधीक्षक अधिकारी श्री. प्रकाश सांगळे, ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय न्याहारकर, द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले ...