शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा - सौ.सुजाता थेटे

प्रवरेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न लोणी (प्रतिनिधी): आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लांबी, रुंदी आणि खोली अशी त्रिसूत्री पूर्ण असावी लागते तसेच आपल्या जीवनातही त्रिमिती पूर्ण केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, या निमित्त लांबी म्हणजे दीर्घायुषाची, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्तीची व खोली म्हणजे परोपकार. प्राप्त ज्ञानाचा व अर्थार्जनाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी वापरला, तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन सौ. सुजाता थेटे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी केले. या वेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता थेटे उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल...