अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम महत्त्वाचे - अमोल दैने

अमोल दैने यांची ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार लोणी (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल दैने यांची ऍग्री फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडला.यावेळी अमोल दैने सोबत महाविद्यालयातील माजी विद्यार्थी स्पेशालिस्ट ऑफिसर बँक ऑफ बडोदातील कु.कोमल बुले, ऍग्री असिस्टंट कु.श्यामला तळोले, सहायक प्राध्यापक सौ.शितल भालके आदी माजी विद्यार्थी पण उपस्थित होते. आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की बौद्धिक क्षमतेच्या जोडीला ध्येय,चिकाटी आणि जिद्द असेल तर अशक्य गोष्टीही सहज सोप्या होतात आणि फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात जसे अर्जुनाला सगळे झाड न दिसता फक्त त्यावर बसलेला पक्ष्याचा डोळा दिसला तसेच आप...