कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

सादतपूर मध्ये रा.सो.यो.मार्फत पी.एम किसान योजना शिबिर लोणी(प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळसाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत मौजे सादतपूर ता-संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कृषी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक मा.डॉ.एम बी खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार संपन्न झाल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी केली... सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयोचे कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण,सादतपुर येथील सरपंच सौ.अंजनीताई कडलग, श्री.बबनराव काळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे तसेच स्वयंसेवकांनी कॉलेज -नॉलेज -व्हिलेज या प्रक्रियेतू...